मुंबईसह कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्यानं कोणत्या जिल्ह्यासाठी दिला ऑरेंज अलर्ट?
VIDEO | राज्यातील 'या' भागात वादळीवाऱ्यासह अवकाळीचा इशारा, आधीच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण होत नाही तोपर्यंत हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी पुन्हा चिंतेची बातमी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागातील शेतकरी गारपीट आणि अवकाळी पावसाने त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकल्याचे पाहायला मिळत आहे. आधी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामेदेखील पूर्ण होत नाही. शेतकऱ्यांना कोणती मदत मिळत नाही तर तोपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उद्या मुंबईसह कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या अलर्टसह अवकाळी पावसाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर विदर्भात पुढील ५ दिवस गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.