काँग्रेसचं भर अवकाळी पावसात सत्याग्रह आंदोलन, नाना पटोले ओले चिंब अन्…
VIDEO | विदर्भात अवकाळी पाऊस सुरु असताना काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन, भर पावसात नाना पटोले यांनी व्यक्त केला निर्धार, म्हणाले...
नागपूर : राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. यानंतर देशभरातून काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलने केली जात आहे. विदर्भात अवकाळी पाऊस सुरु असताना काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. पावसात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलन केले. पाऊस सुरु असताना काँग्रेसचा संघर्ष सुरु असून नाना पटोले यांनी आपला निर्धार व्यक्त करत म्हटले की, आम्ही कुठलाही संघर्ष करायला तयार आहोत. नागपुरात भर पावसात काँग्रेसने आपले सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार भर पावसात कार्यकर्त्यांसह बसून सत्याग्रह करत असल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Mar 26, 2023 04:56 PM