अवकाळीचा भूईमूग पिकाला फटका, पिकांवर विपरीत परिणाम बळीराजा चिंतेत

| Updated on: May 08, 2023 | 3:12 PM

VIDEO | गेल्या दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या अवकाळीचा पिकांवर विपरीत परिणाम, भुईमूगाचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल

नांदेड : राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तर अवकाळी आणि वादळ वाऱ्यानं अनेकांचे संसारही उघड्यावर पडले आहेत. अशातच नांदेडमध्ये गेल्या बारा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने उन्हाळी पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भुईमुंग पीक घेतले जाते. मात्र भुईमुंग पीक ऐन परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना सातत्याने अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे भुईमुंग पिकांच्या शेंगाला जमिनीतच कोंब फुटले आहेत. गरज नसताना अवकाळी पाऊस पडल्याने भुईमुंगाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

Published on: May 08, 2023 03:12 PM
रोज सकाळी तेच तेच बोलत असतात, एकदा ते जोरदार आपटतील; संजय राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची सडकून टीका
कोकणात अवकाळीचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस कसं असणार हवामान?