वादळं, गारा अन् अवकाळीचा हाहाकार, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान; दोघांचा मृत्यू

| Updated on: Apr 29, 2023 | 12:29 PM

VIDEO | अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतपिकांसह फळबागांना फटका तर जिल्ह्यात दोघांचा दोन वेगळ्या घटनांनी दुर्दैवी मरण

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात नेवासा, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावात काल जोरदार वाऱ्यासह गारांच्या पावसाने प्रचंड नुकसान झालंय. नेवासा तालुक्यात विविध भागात गारांच्या पावसाने हजेरी लावली. नेवासा तालुक्यातील नेवासा शहरासह मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, वाटापूर, अमळनेर, निंभारी, गोणेगाव, पाचेगाव, पुणतगाव,सोनईसह परिसरात ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतपिकांसह फळबागांच मोठ नुकसान झाल्याचे पाहायला मिळालेय अचानक वादळी पाऊस चालू झाल्याने कांदा झाकण्यासाठी घराबाहेर गेलेल्या १० वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावर वीज पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नेवासा तालुक्यातील म्हसले येथे ही घटना घडलीय. साई राजेंद्र शिरसाठ असे या चिमुकल्याचे नाव आहे तर कोपरगावात अंगावर झाड कोसळून तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याची माहिती मिळतेय. जिल्ह्यात अवकली पावसाने बळीराजा हवालदिल झाल्याने त्याच्यासमोर आर्थिक संकंट उभं ठाकलं आहे.

Published on: Apr 29, 2023 12:27 PM