बुलढाण्यात अवकाळीचा पुन्हा फटका; बळीराजा खचला, झाडे रस्त्यावर उन्मळून पडली अन्…
VIDEO | बुलढाणा जिल्ह्यात कालपासूनवादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, अनेक रस्ते बंद तर वीज खंडी; नागरिक हैराण
बुलढाणा : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पुन्हा फटका बसला असून बऱ्याच रस्त्यावरचे झाडे उन्मळून पडली आहेत, त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद तर विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याची माहिती मिळतेय. बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा जिल्ह्यातील डोणगाव, गोहेगाव , पिंप्री, अंचाळ या परिसरात पडला. तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक सुद्धा बंद झाली होती. एसटी बस समोर झाड पडल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी रास्ता बंद झाल्याने प्रवाशांनी पायी चालत जाऊन घर गाठले. तर सोसाट्याच्या हवेमुळे विद्युत खांब पडल्याने या परिसरात असलेल्या गावातील विद्युत पुरवठा सुद्धा बंद झाला होता. या भागात काही प्रमाणात गारपीट सुद्धा झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडत आहे , दिवसभर ऊन आणि सायंकाळी पाऊस पडत असल्याने नागरिक हैराण झालेत.