नंदुरबार जिल्ह्यात बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
काढणीला आलेल्या मिरची कापूस आणि भात पिकाच्या होत्याचं नव्हतं झालं तर फळबागा आणि भाजपाला सोबतच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला होता त्यातच अवकाळी पावसाची भर पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या
नंदुरबार, २८ नोव्हेंबर २०२३ : नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा आणि धडगाव या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या मिरची कापूस आणि भात पिकाच्या होत्याचं नव्हतं झालं तर फळबागा आणि भाजपाला सोबतच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला होता त्यातच अवकाळी पावसाची भर पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे आता मायबाप सरकारने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने मदत मिळावी अशी मागणी आता शेतकरी राजा कडून करण्यात येत आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ३६ तासापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, गावकरी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातीळ डोंगर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने अनेक भागात विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.