जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
वातावरणात झालेल्या बदलामुळे जळगाव जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला.
जळगाव: वातावरणात झालेल्या बदलामुळे जळगाव जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, आज देखील पाऊन पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही अंशी वाढ झाली आहे.
Published on: Nov 22, 2021 12:06 PM