अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर कडाडले
डिसेंबर, जानेवारीदरम्यान अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा भाजीपाल्याच्या पिकाला बसल्याचे दिसून येत आहे. ऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस झाल्याने पावसामुळे पीक खराब झाले त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
रत्नागिरी: जिल्ह्यात डिसेंबर, जानेवारीदरम्यान अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा भाजीपाल्याच्या पिकाला बसल्याचे दिसून येत आहे. ऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस झाल्याने पावसामुळे पीक खराब झाले, तसेच उत्पन्नात देखील घट झाली. परीणामी पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने जिल्ह्यत भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. मिरचीचा दर तर तब्बल 180 रुपये किलोवर पोहोचला आहे.