Congress | लखीमपूरमधील घटनेनंतर काँग्रेसचं मुंबईत आंदोलन

| Updated on: Oct 04, 2021 | 6:10 PM

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून मुंबईतही आंदोलन करण्यात आलं.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 4 October 2021
Aryan Khan | आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, किल्ला कोर्टचा निर्णय