येणाऱ्या जिल्हा परिषद आणि Mahapalika Election आम्ही BJP सोबत युती करून लढणार – Ramdas Athawale

| Updated on: Feb 22, 2022 | 1:53 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) हे दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील(ZP Elections) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation Elections) पार्श्वभूमीवर आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) हे दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील(ZP Elections) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation Elections) पार्श्वभूमीवर आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली आहे. आगामी निवडणुकीतील पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी टीव्ही 9 प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच महापालिका निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत निवडणुक लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आगामी निवडणुकांमध्ये आरपीआयची काय भूमिका असेल असा प्रश्न विचारला असता रामदास आठवले म्हणाले, मराठवाड्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांची या संदर्भात आम्ही महत्त्वाची बैठक ठेवली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये तसेच मराठवाड्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आता कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत. याविषयी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपाला पाठींबा देणार की स्वतः उमेदवार उभे करणार, असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारला असता, आम्ही काही जागा भाजपकडून मागून घेऊ, त्या ठिकाणी आरपीआयचे उमेदवार उभे करू, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

Published on: Feb 22, 2022 12:00 PM
पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्प्यात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन | Pune Metro
मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची पंतप्रधानांना पाठवलं निवेदन