कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची नोटीस, काय म्हटलंय त्यात?

| Updated on: Jul 20, 2024 | 10:26 AM

वारंवार नाव बदलून खेडकरांनी स्वतःची ओळख लपवल्याचे म्हणत तुमची निवड का रद्द करू नये, अशी नोटीस UPSC ने पूजा खेडकर यांना बजावली आहे. त्यामुळे पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची खुर्ची धोक्यात आहे. वेगवेगळी नावं बदलून पूजा खेडकर यांनी परीक्षा दिल्याचा आरोप आहे.

Follow us on

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात अखेर यूपीएससीने गुन्हा दाखल केला आहे. वारंवार नाव बदलून खेडकरांनी स्वतःची ओळख लपवल्याचे म्हणत तुमची निवड का रद्द करू नये, अशी नोटीस UPSC ने पूजा खेडकर यांना बजावली आहे. त्यामुळे पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची खुर्ची धोक्यात आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले की, अनेकदा नाव बदलून परीक्षा दिल्या. स्वतः बरोबर आई-वडिलांचंही नाव बदललं. इतकंच नाहीतर फोटो, स्वाक्षरी, पत्ता आणि मोबाईल नंबरही बदलला. त्यामुळे नियमबाह्यरित्या अनेकदा यूपीएससी परीक्षा दिली. पूजा दिलीप खे़डकर, पूजा मनोरमा दिलीप खे़डकर, पूजा मनोरमा दिलीपराव खे़डकर अशी वेगवेगळी नावं बदलून पूजा खेडकर यांनी परीक्षा दिल्याचा आरोप आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट