Eknath Shinde | कोकणातील माणसाचा विकास होणार, त्याचं भलं होणार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde | कोकणातील माणसाचा विकास होणार, त्याचं भलं होणार : एकनाथ शिंदे

| Updated on: Jan 03, 2022 | 6:54 PM

कोकणातील माणसाचा विकास होणार, त्याचं भलं होणार. मुख्यमंत्र्यांनी मला जबाबदारी दिली, वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याची माझी जबाबदारी, माझं काम मी करतोय, मी कामावर फोकस करतोय. वॉटर टॅक्सी लवकर कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

नवी मुंबई : नाव्हा शेवा सी-लिंक देशातला सर्वात लांब 22 किमीचा प्रकल्प आहे. मुंबई कोस्टलला वरळीला जोडली जाणार आहे. रायगड चिर्लेला जोडला जाणार आहे. अॅडव्हान्स टेकनिक वापरली. जपान, तायवान इथून पार्ट आणून इथे असेंब्लिंग होतंय. यामुळे इंधन वाचेल, वाहतूक कोंडी कमी होईल. सहा लेनचा प्रकल्प असून, 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होई. अडीच तासांचं अंतर 25 मिनिटांत पार पडेल. टोलचा ज्यादा भार पडणार नाही, सरकार टोलबद्दल काळजी घेणार आहे. कोकणातील माणसाचा विकास होणार, त्याचं भलं होणार. मुख्यमंत्र्यांनी मला जबाबदारी दिली, वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याची माझी जबाबदारी, माझं काम मी करतोय, मी कामावर फोकस करतोय. वॉटर टॅक्सी लवकर कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Chhagan Bhujbal | …म्हणून राज्यपालांना निमंत्रण दिलं नाही – छगन भुजबळ
Bharati Pawar | देशात लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती नाही : भारती पवार