Video | शिनसेनेत नसलेल्या लोकांनी सामनाबद्दल बोलू नये, चित्रा वाघ यांना उर्मिला मातोंडकर यांचे प्रत्त्युत्तर
शिवसेनेत नसलेल्या आणि सामना दैनिकाबद्दल फारशी माहिती नसलेल्यांनी याबद्दल फारसं बोलू नये, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत.
मुंबई : मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जातोय. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल असे अनेकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेय. त्यानंतर शिवसेनेनेही आगामी निवडणुका स्बबळावर लढवाव्यात का असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आला. त्याला त्यांनी उत्तर दिलं. यावर नेतृत्व निर्णय घेतं. त्यावर मी बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. तसेच मुळात शिवसेनेने सुरु केलेले शिवसंपर्क अभियान मला महत्त्वाचे वाटते. या अभियानातून लोकांशी संपर्क होतो. तसेच चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले आहे. शिवसेनेत नसलेल्या आणि सामना दैनिकाबद्दल फारशी माहिती नसलेल्यांनी याबद्दल फारसं बोलू नये, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत.