अमेरिकेचं सैन्य थेट युद्धात सहभागी होणार नाही – बायडन
रशियावर आम्ही कडक निर्बंध घातले आहेत, अमेरिका युक्रेनसोबत उभी आहे. मात्र अमेरिकन सैन्य युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या या भूमिकेचा जगातील अनेक देशांकडून विरोध केला जात आहे. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. अमेरिकेकडून रशियाची आर्थिक कोंडी करण्यात आली आहे, सोबतच रशियांच्या विमानांना अमेरिकन एअर स्पेस देखील बंद करण्यात आली आहे. रशियावर आम्ही कडक निर्बंध घातले आहेत, अमेरिका युक्रेनसोबत उभी आहे. मात्र अमेरिकन सैन्य युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले आहे.