माझी क्षमता जास्त, मला गोव्याने चांगला सपोर्ट केला : Utpal Parrikar
‘भाजपमध्ये नसलेल्या माणसाला तिकीट दिलं. माझी क्षमता जास्त आहे. मला गोव्यानं चांगला पाठिंबा दिला. त्याबाबत लोकांना भेटून त्यांचे आभार मानणार आहे’ असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे.
पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Assembly election Result) रंगतदार लढत पणजीत (Panaji) पाहायला मिळाली. दिवंंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांचा पणजीतून पराभव झाला. पण कडवी झुंज दिलेल्या उत्पल पर्रिकर यांनी पराभूत झाल्यानंतर भाजपला थेट टोला लगावला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलत असताना उत्पल पर्रिकरांनी (Utpal Parrikar) आपल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपचा सिम्बॉल माझ्याकडे असता तर मी कुठच्या कुठे गेलो असतो’, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावलाय. ‘भाजपमध्ये नसलेल्या माणसाला तिकीट दिलं. माझी क्षमता जास्त आहे. मला गोव्यानं चांगला पाठिंबा दिला. त्याबाबत लोकांना भेटून त्यांचे आभार मानणार आहे’ असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे.