Goa Election | तुम्ही गुन्हेगारांना तिकीट देता, मग मला का नाही ? उत्पल पर्रिकर यांचा फडणवीसांना सवाल

| Updated on: Jan 14, 2022 | 11:09 AM

उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की उत्पल परिकर केवळ मनोहर परिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. याशिवाय उत्पल यांची वेगळी ओळख आणि कामही नसल्याचे ही फडणवीस पुढे म्हणाले होते. पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

Saamana | …तरीही टांग उपर!, ‘सामना’तून विधानसभा निवडणुकावरुन भाजपवर निशाणा
Pune | पुणे जिल्हा बॅंक अध्यक्षपदाची उद्या निवडणूक, अजित पवारांनी बोलावली बैठक