अजितदादांनी आता गुरंढोरं सांभाळावीत, लोकसभेतील दारूण पराभवानंतर कुणाचा खोचक सल्ला?

| Updated on: Jun 06, 2024 | 4:18 PM

Uttam Jankar On Ajit Pawar : रायगड लोकसभा मतदारसंघात सुनिल तटकरे विजयी झाले. मात्र इतर कुठेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला विजय मिळाला नाही. यावरून उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तम जानकर म्हणाले... अजित दादांना मी सांगितलं होतं की साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे.

रायगडमधील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदावर अनंत गीते यांच्यात लोकसभेची चुरशीची लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघात सुनिल तटकरे विजयी झाले. त्यांनी अनंत गीते यांना पराभूत करत 82 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. सुरूवातीपासूनच तटकरे विरूद्ध अनंत गीते यांच्यातील ही लढत अटीतटीची झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र इतर कुठेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला विजय मिळाला नाही. यावरून उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तम जानकर म्हणाले, अजित दादांना मी सांगितलं होतं की साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे. शंभर पेक्षा अधिक आमदार यावेळेस निवडून आणायचे आहेत असं साहेबांच्या डोक्यात आहे आणि या संघर्षामध्ये तुम्ही सामील व्हा. अनिल देशमुख, संजय राऊत यांनी देखील जेलवाऱ्या केल्या आहे. तुम्हाला देखील आठ पंधरा दिवस जेलवारी करावी लागेल पण संघर्षातून तुम्ही उभे रहा परंतु त्या माणसाने शेवटी गटारीचे पाणी पिले जे व्हायचे ते झाले’, अशी घणाघाती टीका उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर केली तर अजित पवारांनी गुरढोर बघत शेती सांभाळावी राजकारण सोडून द्यावे असा उत्तम जानकर यांनी सल्ला दिला.

Published on: Jun 06, 2024 04:18 PM
पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दीच गर्दी; लोकसभेच्या पराभवानंतर समर्थक ढसाढसा रडले
Baramati Supriya Sules : फक्त बारामती किंवा महाराष्ट्रातच नाहीतर सातासमुद्रापारही सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष