Special Report | महाराष्ट्राचा फॉर्म्युला योगींचा फायदा की तोटा?
भाजपने पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सीएम योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या विधानसभा मतदारसंघातून लढणार नाहीत. आदित्यनाथ यांना गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील 105 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपने पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सीएम योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.