दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन्…; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
गेल्या 10 मे पासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. तेव्हा पासून भाविकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे. चार धाम पैकी एक असणाऱ्या केदारनाथ धाम येथे दररोज 25 हजाराहून अधिक यात्रेकरू भाविक केदारनाथ धामला दाखल होत आहेत. बघा केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना घटल्याची दृश्य
उत्तराखंडमधील केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याची माहिती मिळत आहे. केदारनाथ येथील दुर्घटनेतील या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. मात्र या अपघातात हेलिकॉप्टरचे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. दरम्यान, दैव बलवत्तर म्हणून हेलिकॉप्टरमधील 7 जण थोडक्यात बचावले आहेत. याच हेलिकॉप्टर दुर्घटनेची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. गेल्या 10 मे पासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. तेव्हा पासून भाविकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे. चार धाम पैकी एक असणाऱ्या केदारनाथ धाम येथे दररोज 25 हजाराहून अधिक यात्रेकरू भाविक केदारनाथ धामला दाखल होत आहेत. बघा केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्याची आणि काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य
Published on: May 24, 2024 01:34 PM