Rajesh Tope | राज्यातील लसीकरण यंत्रणा सक्षम, मात्र केंद्राकडून लसीच उपलब्ध नाही : राजेश टोपे
राज्यामध्ये लसीकरणाची यंत्रणा सक्षम आहे, मात्र जर लसच उपलब्ध झाली नाही तर ती दिली जात नाही, असं सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारला जबाबदार धरलय. ते पिंपरीमध्ये बोलत होते.
राज्यामध्ये लसीकरणाची यंत्रणा सक्षम आहे, मात्र जर लसच उपलब्ध झाली नाही तर ती दिली जात नाही, असं सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारला जबाबदार धरलय. ते पिंपरीमध्ये बोलत होते. शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबत समितीचा अहवाल चार ते पाच दिवसात अपेक्षित आहे, त्यानंतर निर्णय घेऊ अस टोपे यांनी स्पष्ट केलंय. धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, पण सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर आपण वेट अँड व्हॉच च्या भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण झाले तरी कोरोना होणार नाही असे नाही, मात्र मृत्यू होणे किंवा प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प होते त्यामुळे लसीकरण महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. मॉल धारकांनी त्यांच्या संपूर्ण कामगारांचे लसीकरण करून घ्यावे, असंही ते म्हणाले.