Rajesh Tope | जिथे जिथे पूरपरिस्थिती, तिथे तिथे आरोग्य व्यवस्था सुरु केल्या : राजेश टोपे
जिथे जिथे पूरस्थिती असेल, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. या भागात लसीकरण करा असं सांगितलं आहे, आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत, सर्व जण मदत करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
“राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत,आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेबांना घेऊन भेटायला जाणार आहोत”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
जिथे जिथे पूरस्थिती असेल, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. या भागात लसीकरण करा असं सांगितलं आहे, आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत, सर्व जण मदत करतील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अलर्ट देत असतो त्यानुसार सर्व योजना केल्या जात असतात, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
(Vaccination Will be Increased in Flood Affected Area Says health Minister Rajesh Tope)
Published on: Jul 23, 2021 02:36 PM