Vaibhav Naik | नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा : वैभव नाईक
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केलीय. नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्याची जत्रा आहे. राणे कुटुंबीय विविध पक्षातून जत्रा करत आहेत, असं नाईक यांनी म्हटलंय.
मुंबई : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन शिवसेना तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केलीय. नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्याची जत्रा आहे. राणे कुटुंबीय विविध पक्षातून जत्रा करत आहेत. चिपी विमानतळ हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय.