Beed | परळीत वैद्यनाथ अर्बन बॅंकेचा अधिकारी अटकेत, राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Sep 04, 2021 | 11:57 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीतील वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.

उस्मानाबादच्या सावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी मधल्या वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून 46 कोटी रुपयाची साखर ठेवली होती. याच घोटाळाप्रकरणी कळंब पोलीस स्टेशन मध्ये शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वी एकास अटक झाली होती, आता ही दुसरी अटक करण्यात आलीय.

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 4 September 2021
Sadabhau Khot | प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार, सदाभाऊ खोत आरोप