Walmik Karad Property Video : घरगडी वाल्मिक कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती? ईडीचा ससेमिरा लागणार?
एक घरगडी ते हजारो संपत्ती, करोडोंचा मालक वाल्मिक कराडवर लवकरच ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण फर्ग्युसन रस्त्यावर वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचे २५ कोटी किमतीचे ऑफिसेस असल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडने ज्योती जाधवच्या नावे पुण्यातील महागड्या फर्ग्युसन रस्त्यावर अलिशान ऑफिस खरेदी केल्याचं समोर आलंय. त्यामुळे एक घरगडी ते हजारो संपत्ती, करोडोंचा मालक वाल्मिक कराडवर लवकरच ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण फर्ग्युसन रस्त्यावर वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचे २५ कोटी किमतीचे ऑफिसेस असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, आरोपांनुसार वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णु चाटेच्या नावे २५ कोटी किमतीचे ऑफिसेस खरेदीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराड फरार असताना ज्योती जाधवची चौकशी पोलिसांनी केली होती. इतकंच नाहीतर पुण्यातील मगरपट्टा भागात एका फ्लॅटची किंमत १५ कोटी रूपये आहे, त्या टॉवरमध्ये सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांनुसार, ७५ कोटींचा एक फ्लोअर वाल्मिक कराडने आपल्या ड्रायव्हरच्या नावे खरेदी केला आहे. माजलगाव येथे सुदाम नरोडे यांच्या नावे ५० एकर जमीन, ज्योती जाधव यांच्यानावे बार्शीत ५० एकर जमीन यासह कराडने किती माया जमवली बघा व्हिडीओ….