‘वंचित’च्या बी.डी चव्हाणांचं अर्ज दाखल करण्यापूर्वी औक्षण अन् माकडाची एन्ट्री, पुढे काय घडलं, बघा व्हिडीओ
हिंगोलीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी. डी. चव्हाण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बी. डी. चव्हाण हे आपला लोकसभेचा अर्ज दाखल करण्यापूर्वी नांदेडच्या निवासस्थानी औक्षण करण्यात आलं. दरम्यान, बी. डी. चव्हाण यांचं औक्षण सुरू असताना तिथे एका माकडानं एन्ट्री घेतली
हिंगोलीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी. डी. चव्हाण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बी. डी. चव्हाण हे आपला लोकसभेचा अर्ज दाखल करण्यापूर्वी नांदेडच्या निवासस्थानी औक्षण करण्यात आलं. दरम्यान, बी. डी. चव्हाण यांचं औक्षण सुरू असताना तिथे एका माकडानं एन्ट्री घेतली. यावेळी बी. डी. चव्हाण यांनी माकडाला खाण्यास देऊन त्यांचे दर्शन घेतले. या घटनेचा व्हिडीओचा बी. डी. चव्हाण यांच्या मतदारसंघात चांगलाच व्हायरल होतोय. तर वंचित कडून हिंगोली लोकसभेसाठी डॉक्टर बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी दिल्यानंतर नांदेड येथील चव्हाण यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले होते. सर्व ओबीसी वंचित, पीडित घटकांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला मतदान करावे. महाराष्ट्रातील दीड करोड बंजारा समाजाच्या वतीने बाळासाहेबांचे ऋण व्यक्त करतो. हिंगोली लोकसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला होता.