प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात आंबेडकर रुग्णालयात, कार्यकर्त्यांना आवाहन काय?

| Updated on: Apr 12, 2024 | 1:52 PM

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. या लढतीत आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी वंचित कार्यकर्त्यांसह सुजात आंबेडकर यांच्याकडून वडिलांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अकोल्यात गेल्या एक आठवड्यापासून चांगलाच उष्मा वाढला आहे. त्याचाच फटका सुजात यांना बसल्याचे दिसतंय.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यांना उन्हाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. या लढतीत आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी वंचित कार्यकर्त्यांसह सुजात आंबेडकर यांच्याकडून वडिलांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अकोल्यात गेल्या एक आठवड्यापासून चांगलाच उष्मा वाढला आहे. सध्या अकोल्यातील तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. या तापमानाचा फटका सुजात आंबेडकर यांना बसला आहे. रूग्णालयात दाखल झालेल्या सुजात आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. माझी तब्येत चांगली आहे. काळजी करण्याचं कारण नाही. मी आंबेडकर जयंतीपासून पुन्हा प्रचारात सहभागी होणार आहे, असा संदेश सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच प्रचारात खंड पडू देऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 12, 2024 01:52 PM
शरद पवार 55 वर्षांनंतर राजकीय प्रतिस्पर्धी आणि कट्टर विरोधकाची घेणार भेट, काय कारण?
बीड जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट; पीक डोळ्यादेखत वाया अन् बळीराजा हवालदिल