तर मोदी बोकांडी बसतील, प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा
'कोण म्हणत आम्ही इतक्या जागा लढवू, कोण म्हणत आम्ही तितक्या जागा लढवू, मी म्हणतो त्या जागा सोडा. तुम्हाला पक्ष घालवायचाय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालवायचंय? याचा पहिल्यांदा निर्णय करा, जर मोदींना घालवायचं असेल तर दोन, चार जागा कमी आल्यात तरी चालतील'
मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : जागेचा लोभ सोडा, पक्ष वाढवायचाय की मोदींना घालवायचं हे आधी ठरवा. आणि मोदींना घालवायचं असेल तर जागा कमी आल्या तरी चालेल ही भूमिका हवी, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलंय तर महाविकास आघाडीला इशाराही दिलाय. कोण म्हणत आम्ही इतक्या जागा लढवू, कोण म्हणत आम्ही तितक्या जागा लढवू, मी म्हणतो त्या जागा सोडा. तुम्हाला पक्ष घालवायचाय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालवायचंय? याचा पहिल्यांदा निर्णय करा, जर मोदींना घालवायचं असेल तर दोन, चार जागा कमी आल्यात तरी चालतील अशी भूमिका असली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. नाहीतर म्हणाल मला एवढ्या जागा पाहिजे तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्यही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 26, 2023 01:09 PM