कमळाला मतदान केल्यास गावागावात गोध्रा घडेल, भाजपवर कुणी केला गंभीर आरोप
VIDEO | धार्मिक मुद्द्यावर पुन्हा राजकारण होणार? गोध्रा जळीतकांडाविषयी कुणी केला गंभीर दावा
बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आदिवासी मेळाव्याच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यात आले असता त्यांनी भाजपासह पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ग्रोधा जळीतकांडाविषयी एक गंभीर दावाही केला आहे. तसेच त्यांनी भाजपला मतदान न करण्याचा आवाहनही मुस्लिमांना केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धार्मिक मुद्द्यावर राजकारणाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ते म्हणाले, ‘मला १०० टक्के माहिती आहे की, मुसलमान कमळाला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की मी आता मतदान केलं तर गावागावात ग्रोधा झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसलेली आहे.’ तर गोध्राची दंगल प्रकरणी मी भाजपवाल्यांना चॅलेंज देतो की, माझ्यासोबत बसा, खुले आम याचं कारण असं की, रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. पण तो बाहेरून जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.