Prakash Ambedkar| अनिल देशमुख यांनी दुसऱ्याला वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar| अनिल देशमुख यांनी दुसऱ्याला वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये – प्रकाश आंबेडकर

| Updated on: Nov 09, 2021 | 10:09 PM

अनिल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले.

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर देशमुख यांची पुन्हा एकदा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खळबळजनक दावा केलाय. अनिल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले.

Special Report | मंत्री नवाब मलिक यांच्या मागे NIA, ED लागणार का?
Nitesh Rane | राणे मंत्री झाले, राऊत खासदारकीमध्येच – नितेश राणे