‘वंदे भारत’ची कसारा घाटात यशस्वी चाचणी, किती दिवस होणार ट्रायल?
रेल्वे मंत्रालयातर्फे महाराष्ट्राला 2 नव्या 'वंदे भारत'ची भेट, १० फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
मुंबई : रेल्वे मंत्रालयातर्फे महाराष्ट्राला पुन्हा 2 नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट देण्यात येणार आहे. पहिली वंदे भारत ही सीएसएमटी ते शिर्डी तर दुसरी सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे. या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असताना ग्रीन सिग्नल दाखवणार आहेत. यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसची कसारा घाटात यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. तर येत्या १० फेब्रुवारीपर्यंत कसारा घाटात रोज २ ते ३ चाचण्या घेण्यात येणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावणार आहे. मेक इन इंडियाचं उत्पादन असणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यासाठी सर्वसामान्य देखील उत्सुक आहेत.