विधानसभेआधीच विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?

| Updated on: Sep 12, 2024 | 10:47 AM

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधीदेखील विविध संस्थांचे सर्व्हे समोर येऊ लागले आहेत. सर्व्हेमधील आकडे कोणाच्या बाजूने आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रियेचा सूर ठरतोय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

विधानसभा कोण जिंकेल याचे विविध अंदाज आता समोर येऊ लागले आहेत. यापैकी काही सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे तर काहीमध्ये महायुती पुढे आहे. तर काही सर्व्हेत काँटे की टक्कर होणार असल्याचे म्हटलं जातंय. तुर्तास लोकसभा निवडणुकीला केलेल्या सर्व्हेचा अंदाज चुकीचा ठरल्यामुळे दोन्हीकडील नेते मात्र सावध प्रतिक्रिया देतायत. गेल्या १८ ऑगस्टला टाईम्स मॅट्रिजचा सर्व्हे आला होता. ११ सप्टेंबरमध्ये टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजचा सर्व्हे आला होता. हे दोन्ही सर्व्हे २५ दिवसांच्या अंतराने झाले आहेत. २५ दिवसांआधी करण्यात आलेलया एका सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला जवळपास १०० जागांचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तर २५ दिवसांनंतर करण्यात आलेल्या सर्व्हेत महाविकास आघाडीला अंदाजे १४४ जागा मिळणार असल्याचं भाकीत वर्तविण्यात आलं होते. यातील रंजक गोष्ट म्हणजे करण्यात आलेल्या दोन्ही सर्व्हेत सर्वांचे आकडे बदलले मात्र उद्धव ठाकरे आणि अजित दादा गट यांचे आकडे जैसे थे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Published on: Sep 12, 2024 10:47 AM