Disale Guruji यांचा मार्ग मोकळा, परदेशात जाण्यासाठी परवानगी देण्याचे Varsha Gaikwad यांचे आदेश
डिसले गुरुजींसह शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अहवाल मागवला आहे. हा वाद नेमका काय आणि कसा निर्माण झाला याबाबत चौकशी करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
नाशिक : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींना दिलासा दिला आहे. सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले. डिसले गुरुजींचा रजेचा अर्ज मंजूर करण्याचे शिक्षण विभागाला आदेश दिले. उच्च शिक्षणासाठी डिसले गुरुजींनी अर्ज केला होता. डिसले गुरुजींसह शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अहवाल मागवला आहे. हा वाद नेमका काय आणि कसा निर्माण झाला याबाबत चौकशी करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.