Varsha Gaikwad | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

| Updated on: Dec 28, 2021 | 11:53 AM

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. वर्षा गायकवाड यांनी काल कोरोना सदृश्य लक्षणं जाणवत होती, त्यानंतर मी स्वत: ला आयसोलेट करुन घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे.

Bhaskar Jadhav | राज्यपाल संविधान पाळत नसतील तर राज्य सरकारने त्यांच्याशी दोन हात करावे : भास्कर जाधव
रोहिणी खडसेंच्या वाहनावरील भ्याड हल्ल्याचा निषेध, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी, रुपाली चाकणकरांची मागणी