संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागे वरुण सरदेसाई यांचा हात?, ‘या’ भाजप नेत्यानं विधानसभेत केला गौप्यस्फोट

| Updated on: Mar 03, 2023 | 1:22 PM

VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील शिवाजी पार्कातील हल्ल्याबाबत चौकशी झाली पाहिजे, विधानसभेत कुणी केली मागणी?

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, या हल्ल्यासंदर्भातील मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजताना दिसतोय. संदीप देशपांडे यांचा मनसुख हिरेन, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत केला आहे. इतकेच नाही तर वरूण सरदेसाई यांचा या प्रकरणात काही संबंध आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असा गौप्यस्फोट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

Published on: Mar 03, 2023 01:16 PM
नागपुर येथे ED ची छापेमारी, कुणाकडे टाकला छापा आणि कोण रडारवर?
आधी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं, आता सरकारलाच घेरलं; अजित पवार पुन्हा एसटीच्या ‘त्या’ जाहिरातीवर आले