Vasai | वसईच्या मधुबन परिसरात 2 हजारांच्या नोटांचा पाऊस, नागरिक आश्चर्यचकित

| Updated on: Oct 04, 2021 | 10:10 AM

वसईत चक्क 2 हजार रुपयांच्या नोटांचा ‘पाऊस’ पडला आहे. वसईच्या मधुबन परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा पडलेला खच पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. मात्र या नोटा खोटा असल्याचं स्पष्ट झालं.

वसईच्या मधुबन परिसरात रस्त्यावर पडलेला नोटांचा खच पाहून लहान मुलं आणि काही नागरिकांनी या नोटा जमा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र नोटा उचलून पाहिल्या, तेव्हा त्या डुप्लिकेट असल्याचं समजलं आणि सर्वांचाच हिरमोड झाला.

वसई पूर्व भागातील मधुबन परिसरात दुपारच्या सुमारास सन्नी नावाच्या वेब सीरीजची शूटिंग होती. चित्रिकरणाच्या वेळी 2 हजार रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता. शूटिंग संपल्यानंतर रस्त्यावर डुप्लिकेट नोटांचा खच पाहून आजूबाजूच्या नागरिकांसह लहान मुलांनी नोटा पाहण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 4 October 2021
Mumbai Schools Reopen | मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एकच विद्यार्थी