वसई-विरार, नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी
वसई-विरार, नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. नालासोपारा पूर्व, सेंट्रल पार्क, आचोळा, अल्कापुरीत पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी साचल्याने रिक्षाचालकांनी रिक्षासेवा बंद ठेवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. वसई-विरार, नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. नालासोपारा पूर्व, सेंट्रल पार्क, आचोळा, अल्कापुरीत पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी साचल्याने रिक्षाचालकांनी रिक्षासेवा बंद ठेवली आहे.