पुणे अपघात प्रकरणावर वसंत मोरे म्हणाले, आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते कारण…

| Updated on: May 23, 2024 | 2:00 PM

कल्याणी नगर येथे हिट अँड रनचा जो प्रकार घडला, त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर येथे हिट अँड रनचा जो प्रकार घडला, त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. या प्रकरणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. तर अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला, तो दुर्देवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते, असं म्हणत वसंत मोरे यांनी खोचक टोला लगावला आहे. तर नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? असा खोचक सवाल करत वसंत मोरे यांनी असेही म्हटले की, ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे.

Published on: May 23, 2024 01:34 PM
काका कमळ फूल… 3 नंबरचं बटण… एका मतासाठी 500 रूपये, व्हिडीओ होतोय व्हायरल
जेष्ठ म्हणून आदर पण गांधीवादाचा मुखवटा लावून…, रोहित पवारांचं अण्णा हजारेंना प्रत्युत्तर