मी तात्या पेक्षा मोठा… वसंत मोरेंना मोठा भाऊ म्हणून धंगेकरांचा मोलाचा सल्ला काय?

| Updated on: Mar 16, 2024 | 4:24 PM

पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्यांना सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी ऑफर दिल्या. मात्र वसंत मोरे यांनी थोडा वेळ मागून घेतला होता. अशातच आता वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांच्याशी भेट घेतली

पुणे, १६ मार्च २०२४ : पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्यांना सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी ऑफर दिल्या. मात्र वसंत मोरे यांनी थोडा वेळ मागून घेतला होता. अशातच आता वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांच्याशी भेट घेतली. यावेळी मोरे म्हणाले, ‘धंगेकर हे माझे गुरू आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळं त्याच मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे. सहज भेट घेतली बाकी राजकीय काही नाही. आम्ही दोघेही खासदारकीसाठी इच्छुक आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात आमचे निर्णय कळतील.’ यावेळी रवींद्र धंगेकर यांनी वसंत मोरे यांचा मोठा भाऊ म्हणून काही सल्ला दिला. ते म्हणाले, ‘मी दोन तीन वर्षानी तात्या पेक्षा मोठा आहे, त्यांना राजकारणाबद्दल सांगितलं. राजकारण सोप नाही, विचार करून निर्णय घ्यावा असा सल्ला दिलाय, आपल्याला ज्या पक्षाने मोठ केलं त्या पक्षावर टीका करू नका. वेळ घ्या आणि योग्य वाटेल त्या पक्षात जा’, असा सल्ला रवींद्र धंगेकर यांनी वसंत मोरे यांना दिला.

Published on: Mar 16, 2024 04:23 PM
हे माझं भाग्य… गायिका अनुराधा पौडवाल यांचा मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश, आगामी लोकसभा लढवणार?
लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर, पहिल्या टप्प्यातील मतदान ‘या’ दिवशी होणार