Vedanta Foxconn : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिवसेना आक्रमक! रस्त्यावर उतरणार, आज औरंगाबादेत निदर्शनं

| Updated on: Sep 16, 2022 | 8:03 AM

महाविकास आघाडी सरकार जाऊन आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर राजकीय वातावरण आधीच ढवळून निघालेलं असताना आता हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी जबाबदार कोण, यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Follow us on

मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला (Gujrat) गेल्यानं राजकारण तापलं आहे. या विरोधात अखेर आता शिवसेनेनं (Shiv sena) आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. औरंगाबादेत आज शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरुन निदर्शनं केली जाणार आहे. औरंगाबादमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान, शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात होण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु झाल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकार जाऊन आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर राजकीय वातावरण आधीच ढवळून निघालेलं असताना आता हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी जबाबदार कोण, यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. लाखो रोजगार निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.