नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात यंदा सावरकर जयंती साजरी होणार
VIDEO | नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्येही यंदा वीर सावरकर यांची जयंती साजरी होणार, बघा कशी आहे तयारी?
नवी दिल्ली : स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती ही यंदा नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठिकाणी देखील साजरी केली जाणार आहे. यापार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जय्यत तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाकडू स्वातंत्रवीर सावकरांचा जन्मदिवस आहे स्वातंत्रवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशी घोषणा करण्यात आली होती. यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंतीदिनी ठिकठिकाणी सावरकरांच्या जयंतीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत संसद भवनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जय्यत तयारी सुरू आहे आणि ती अंतिम टप्प्यात आहे. सकाळी १० वाजता खासदारांसह एकनाथ शिंदे येथे दाखल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात स्वातंत्रवीर सावरकर यांचा मुद्दा गाजर होता तर भाजपने देखील सावकरकर गौरव यात्रा काढली होती. अशातच राज्य सरकारकडून महाराष्ट्र सदनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.