भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा वाडीबंदर इस्टर्न फ्री वे-वर अपघात

| Updated on: Jul 11, 2022 | 1:59 PM

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. वाडीबंदर ईस्टर्न फ्री वे-वर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. वाडीबंदर ईस्टर्न फ्री वे-वर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. ताफ्यातील गाड्या मात्र एकमेकांवर आदळल्या. अपघातात गाड्यांचं नुकसान झालं आहे. भरत गोगावले यांच्या एम एच 06 बी व्ही 5457 या फॉर्च्युनर गाडीचं बोनेट या अपघातात चक्काचूर झालंय. तर गाडीला मागून दुसऱ्या वाहनानं धडक दिली. मुंबईत मंत्रालयाच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी सात गाड्या एकमेकांना धडकल्या आणि ही दुर्घटना घडली.

“..मात्र मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला”, शंकरराव गडाख यांची प्रतिक्रिया
Shivsena: शिवसेनेचे खासदारही बंडाच्या मार्गावर?; मातोश्रीवर 19 पैकी 12 च खासदार उपस्थित