छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक चकमक आता एकेरी शब्दावर, बघा काय झाली अरे-तुरेची भाषा?
मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक वाद आता एकेरी उल्लेखावर आला आहे. जालन्यातील अंबड येथील ओबीसी सभेतून भुजबळ यांनी केलेल्या टीकेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातून प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक वाद आता एकेरी उल्लेखावर आला आहे. ओबीसी सभेतून छगन भुजबळ यांनी तिखट शब्दात टीका केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीही एकेरी शब्दाचा मारा सुरू केलाय. जालन्यातील अंबड येथील ओबीसी सभेतून भुजबळ यांनी केलेल्या टीकेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातून प्रत्युत्तर दिलंय. सध्या राज्यभरात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधणं सुरू आहे. ज्यांच्या नोंदी सापडताय त्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र देखील दिलं जातंय. पण ज्यांच्या नोंदी मिळणार नाही, त्यांना कायदा करून २४ डिसेंबरच्या सरसकट आरक्षण देण्याचं ठरलंय असं जरांगे पाटील म्हणालेत. बघा स्पेशल रिपोर्ट काय म्हणाले जरांगे पाटील…
Published on: Nov 23, 2023 11:41 AM