Special Report : एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक, शिंदे म्हणाले, मी तुमचा चिठ्ठा काढू शकतो…
अजित पवार म्हणाले, आम्हाला इशारा देताय. एकीकडं म्हणायचं आम्हाला चिठ्ठा काढायला लावू नये. हा इशारा नाही का. विरोधकांच्या घोषणांवरून त्यांना त्यांचा चिठ्ठा काढण्याचा इशाराचं शिंदे यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विरोधकांच्या पवित्र्यावरून शिंदेंनी चिठ्ठा काढण्याचाच इशारा दिला. त्यामुळं शिंदे विरोधकांचा कोणता चिठ्ठा समोर काढणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही बोलता त्याच्यापेक्षा जास्त मी बोलू शकतो. डबल, चौबल बोलू शकतो. कारण मी तुमच्या बरोबर काम केलं आहे. त्यामुळं मी तुमचा चिठ्ठा काढू शकतो, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. पण, आम्हाला उत्तर कामामधून द्यायचं असल्याचं ते म्हणाले. परंतु, सहन करण्याची सीमा असते. मर्यादेच्या पलीकडं गेल्यानंतर कुणीही कुणाचा मुलाहिजा ठेवत नाही. त्यावर अजित पवार म्हणाले, आम्हाला इशारा देताय. एकीकडं म्हणायचं आम्हाला चिठ्ठा काढायला लावू नये. हा इशारा नाही का. विरोधकांच्या घोषणांवरून त्यांना त्यांचा चिठ्ठा काढण्याचा इशाराचं शिंदे यांनी दिला.
Published on: Aug 23, 2022 09:12 PM