सुरेश धस अन् अजित पवारांमध्ये ‘मुन्नी वॉर’, बीड हत्या प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?

| Updated on: Jan 09, 2025 | 8:47 PM

सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत, असं वक्तव्य केलं आणि एकच चर्चांना उधाण आलं. दरम्यान, सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी नेमकी कोण? असा सवाल केला जात आहे.

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. आज पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेवरही निशाणा साधला. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी अनेकजण मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत, असं वक्तव्य केलं आणि एकच चर्चांना उधाण आलं. दरम्यान, सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी नेमकी कोण? असा सवाल केला जात आहे. तर सुरेश धस यांनी मुन्नी नेमकी कोण? याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. “मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही. राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो आहे ते त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेले आहे. फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिये…, ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत”, असे सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता दादा काय म्हणाले बघा?

Published on: Jan 09, 2025 08:47 PM
पुण्यात दिवसाढवळ्या तरूणीची हत्या, धारदार सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
‘लक्ष्मण हाके भाजपचे हस्तक’, हातातून माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं