संजय राऊत यांची शाब्दीक धुळवड
गोवा जिंकून आल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकारणाची स्वप्नं पडू लागली असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
गोवा जिंकून आल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकारणाची स्वप्नं पडू लागली असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर नागपुरात झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता आणणार असा विश्वास व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना सल्ला दिला. आज होळी होती त्यातच राजकीय नेत्यांचीही शाब्दीक धुळवड पाहायला मिळाली. यावेळी झालेल्या शाब्दीक धुळवडीत संजय राऊत आणि रावसाहेब दानवे यांनी एकमेकांवर टीका करत नवाल मलिक यांचा विषय पुन्हा एकदा उखरुन काढला.