विदर्भाला मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा, कधी दाखल होणार पाऊस? हवामान खात्यानं दिली तारीख
VIDEO | मान्सून लांबल्याने विदर्भातील शेतकरी चिंतेत, विदर्भात मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागानं काय वर्तविला अंदाज?
मुंबई : कोकणात नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली होती. परंतु अजून पाऊस सक्रीय झालेला नाही. कोकणातून संपूर्ण राज्यात पाऊस पोहचला नाही. त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. यासह विदर्भातही मान्सूनचं आगमन झालेलं नसून विदर्भाला मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. दरम्यान मान्सून लांबल्याने विदर्भातील शेतकरी चिंतेत आहे. तर २० जूननंतर विदर्भात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आणखी चार ते पाच दिवस विदर्भाला मान्सूनचे चटके सोसावे लागणार आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. परंतु शेतकरी ज्याची वाट पाहत आहे, तो मान्सून अजूनही कोकणानंतर राज्यात सक्रीय झालेला नाही. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.