VIDEO : CM Eknath Shinde on Governor | राज्यापालांचं विधान वैयक्तिक, त्याच्याशी आम्ही सहमत नाही
राज्यपालांच्या विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र दिसते आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, राज्यापालांचं विधान वैयक्तिक त्याच्याशी आम्ही सहमत नाही.
राज्यपालांच्या विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र दिसते आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, राज्यापालांचं विधान वैयक्तिक त्याच्याशी आम्ही सहमत नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा नुसता समाचारच घेतला नाही तर त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवत त्यांनी महाराष्ट्रातील हिंदूंमध्ये फूट फाडण्याचं नीच काम केल्याची घणाघाती टीका केली. ‘मराठीच नाही तर अमराठी हिंदूंनीही राज्यपालांच्या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त केला. तेही चिडले आहेत. असं कधी झालं नव्हतं आणि असं होता कामा नये, असं लोक म्हणत आहे. कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं.’ असं संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
Published on: Jul 30, 2022 02:31 PM