VIDEO : CM Eknath Shinde on Vinayak Mete Death | ‘मराठा समाजासाठी संघर्ष करणारा नेता हरपला’
मराठा समाजासाठी संघर्ष करणारा नेता हरपला आहे. विनायक मेटे नेहमीच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संघर्ष करत होते. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ते आग्रही होते आणि नेहमीच त्यासंदर्भात ते पाठपुरवठा करत असत. विनायक मेटेंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या निधनाची बातमी सर्वांसाठी अतिशय धक्कादायक आहे. मुंबईकडे येत असताना खोपोली दरम्यान त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने त्यांचे निधन झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेलकडे रवाना झाले आहेत. आता विनायक मेटेंच्या अपघाती निधनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून शिंदे म्हणाली की, मराठा समाजासाठी संघर्ष करणारा नेता हरपला आहे. विनायक मेटे नेहमीच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संघर्ष करत होते. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ते आग्रही होते आणि नेहमीच त्यासंदर्भात ते पाठपुरवठा करत असत. विनायक मेटेंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे.
Published on: Aug 14, 2022 08:59 AM