Aryan Khan | नो मेडीकल, नो रिकव्हरी, नो ड्रग्ज, आर्यन खान प्रकरणात मुकुल रोहतगींचा युक्तिवाद

| Updated on: Oct 26, 2021 | 6:26 PM

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला.

क्रुझवर पोहोचण्याआधीच आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती, अशी धक्कादायक माहिती आर्यनचे वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टात दिली आहे. त्यामुळे आर्यन खान अटक प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रुझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असं रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 26 October 2021
Aryan Khan | आर्यन खानचा आजचा मुक्काम तुरुंगातच, हायकोर्टात 27 ऑक्टोबरला पुढील सुनावणी