VIDEO : Sanjay Raut | ‘छत्रपतींना चुकीची माहिती कोण देणार?’;राऊतांचा फडणवीसांना सवाल

| Updated on: May 29, 2022 | 1:58 PM

काही सडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट लिहून अपुरी माहिती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पुरवली. यातून संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यात अंतर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते. छत्रपतींचा अपमान करू नका असा.

काही सडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट लिहून अपुरी माहिती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पुरवली. यातून संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यात अंतर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते. छत्रपतींचा अपमान करू नका असा. चुकीच्या माहितीवर शाहू महाराज बोलणार नाहीत. फार ज्येष्ठ आहे ते. ज्या घराण्याचा वारसा ते घेऊन जात आहेत. तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केली जात नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

Published on: May 29, 2022 01:58 PM
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 May 2022
मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! लोकलच्या वेळेत बदल